Breaking News
बुलढाणा जिल्हा

खामगांव येथे कोरोना संसर्ग परिस्थिती आढावा सभा

विशेष प्रतिनीधी बुलडाणा, दि. 26 : कोरोनाचा संसर्ग खामगांव शहरात वाढत आहे. पॉझीटीव्ह आलेल्या रूग्णाच्या हाय रिस्कमधील व्यक्तींची संख्या मोठी आहे. कोरोनाच्या तपासण्यादेखील वाढल्या आहेत. त्यामुळे कोविड केअर सेंटरमध्ये संशयीत व्यक्ती दाखल करण्याचे प्रमाण मोठे आहे. अशा परिस्थितीत खामगांव शहरातील कोविड केअर सेंटरमधील सुविधांचा दर्जा उच्च ठेवून दाखल व्यक्तींना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज दिल्या. कोरोना संसर्ग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खामगांव उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री बोलत होते.

यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर, नगराध्यक्षा अनिताताई डवरे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ प्रेमचंद पंडीत, उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण, तहसीलदार श्री. रसाळ, मुख्याधिकारी धनंजय बोरीकर आदींसह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.जवळच असलेली व खामगावसाठी धोकादायक ठरणारी अकोला जिल्हा सीमा सील करण्याचे सूचीत करीत पालकमंत्री म्हणाले, या सीमेवर मोठ्या प्रमाणावर गस्त वाढविण्यात यावी. बंदोबस्त चोख ठेवावा. विनाकारण येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी करावी. सीमेवर आरोग्य कर्मचाऱ्यांची व्यवस्था करावी. कारणास्तव येणाऱ्या नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. संशयीतांना बाहेर काढून विलगीकरण करावे. शहरातील भाजीपाला विक्रेत्यांची व्यवस्था करण्यात यावी. एकाच ठिकाणी भाजीपाला विक्रीमुळे गर्दी होणार याची काळजी घ्यावी. शहरात ठिकठिकाणी भाजीपाला विक्रेत्यांना जागा देवून एकाच ठिकाणी भाजीपाला खरेदीसाठी होणारी गर्दी टाळावी.

पालकमंत्री पुढे म्हणाले, शहरात जरी कोरोना बाधीत व्यक्तींची संख्या वाढत असली, तरी घाबरून जावू नये. तपासण्या वाढल्यामुळे रूग्णसंख्या वाढत आहे. तसेच शहरातील बरे होणाऱ्या रूग्णांचे प्रमाणही चांगले आहे. शासन, प्रशासन खामगांवच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. येथील कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे. खामगांवसाठी मास्क, सॅनीटायझर, औषधांचा साठा विपुल प्रमाणात ठेवण्यात यावा. यामध्ये कमतरता येवू नये. नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये. अत्यावश्यक कामासाठी निघाल्यास तोंडावर मास्क किंवा रूमाल वापरावा, घरात आल्यावर हात धुवावे, लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवानही पालकमंत्री यांनी यावेळी केले. सभेला खामगांव शहरातील व्यापारी, नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक