बुलढाणा जिल्हा

ज्ञानगंगा प्रकल्प 68 तर ढोरपगांव लघु प्रकल्प 84 टक्के भरला

नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा

विशेष प्रतिनीधी बुलडाणा, दि.26: सिंचन शाखा तांदुळवाडी अंतर्गत असलेला मध्यम प्रकल्प ज्ञानगंगा 68 टक्के व ढोरपगांव लघु पाटबंधारे प्रकल्पामध्ये 84 टक्के पाण्याने भरला आहे. या दोन्ही धरणाचे पाणलोट क्षेत्रात आणखी पाऊस झाल्यास धरण केव्हाही पूर्ण क्षमतेने भरून सांडवा प्रवाहीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणाचे खाली नदीला पूर येण्याची दाट शक्यता आहे. ज्ञानगंगा नदीकाठावरील 36 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये खामगांव तालुक्यातील गेरू माटरगांव, श्रीधर नगर, गेरू, वर्णा, दिवठाणा, निमकवळा, पोरज, तांदूळवाडी, पिं.राजा, घाणेगांव, ज्ञानगंगा (काळबाई), वळती खु, वळती बु, वसाडी खु, वसाडी बु, धानोरा खु, धानोरा बु, वडगांव, खातखेड, वडाळी, रसुलपूर, खुदानपूर, नांदुरा तालुक्यातील नांदुरा, भुईसिंगा, निमगांव, नारायणपूर, रामपूर, अवधा बु, अवधा खु, नारखेड, वरूड, डोलारखेड, हिंगणा दादगांव, हिंगणा ईसापूर, दादगांव व दौडवाडा गावांचा समावेश आहे. तसेच ढोरपगांव लघु पाटबंधारे प्रकल्पाचा सांडवा प्रवाहीत झाल्यास नदी काठावरील 6 गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामध्ये ज्ञानगंगापूर, कासारखेड, पिं.राजा, भालेगांव, ढोरपगांव व वडजी भेंडी गावांचा समावेश आहे, असे उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे उपविभाग, खामगांव यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक