Breaking News
जालना जिल्हा

परत नवीन 34 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह -एकाच दिवशी 127 जण कोरोना बाधीत

जालना न्यूज जालना जिल्ह्यात ३४ जणांचा अहवाल रविवारी रात्री उशिरापर्यंत पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याच्या आणखी 34 रुग्णांची भर पडली आहे यात सायंकाळ पर्यत ९३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते नंतर रात्री आलेल्या अहवालात परत ३४ रुग्णांची भर पडली आहे यात एक जण बुलढाणा जिल्ह्यातील असून बाकी ३३ जण जालनातील आहे त्याच्या पत्तात फक्त जालना लिहलेले आहे. असे एकूण रविवारी १२७ जण कोरोना बधितांची भर पडली आहे.

सातत्याने भर पडत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांमुळे एकुण बाधितांचा आकडा १८९१ झाला आहे.

कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या संशयितांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल रात्री उशिरा आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यात तब्बल 127 जणांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्याला मोठा धक्का बसला आहे. बाधित रुग्णामध्ये सर्वाधिक रुग्ण हे जालना शहरातील आहे.

जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे एकूण बाधितांचा आकडा आता १८९१ झाला आहे. त्यापैकी १२२२ रूग्ण बरे झाले आहे. तर बावीस रूग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. सध्या कोविड हॉस्‍पीटलमध्ये ५३५ रूग्णांवर उपचार सुरू आहे. असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.

जालना कोरोना मिटर
एकुण बाधित १८९१
उपचार सुरू ५३५
बरे झाले १२२२
मृत्यू ६०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक