मंठा तालुका

तळणीत अवैध भाडे वसूली : रस्त्यावरील दुकाने थाटण्याविरूध्द कारवाई

रस्ता कामाला अतिक्रमणचा अडथळा

तळणी न्यूज नेटवर्क

तळणी न्युज : शेंगाव- पंढरपुर या राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८ सी या दिंडी महामार्गाच्या कामाला तळणी बस स्टॅन्ड भागातील अतिक्रमण अडथळा ठरत असून चौकातील जागा मालक रस्त्यावरच दुकाने थाटून अवैध भाडे वसुली करित असल्याने वाहतूक व रस्ता कामाला अडचण निर्माण करित आहे .


तळणी बस स्टॅन्ड भागातील देवठाणा – उस्वद रोडवर दोन्ही बाजूनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे . विषेश, म्हणजे रस्त्यावर अतिक्रमण करित छोटे दुकाने, हातगाडया, टपरी भाड्याने देऊन अवैध भाडे वसुली केली जात आहे . जागा मालक रस्त्यावर मांडलेल्या दूकानदाराकडून महिन्याकाठी हजारो रूपर्य भाड्यापोटी उकळतात . सध्या दिंडी महामार्गाचे काम तळणी बस स्टॅन्ड भागात सुरू आहे. मात्र , हे काम नियमानुसार न करता अतिक्रमणधारकांच्या सोईनुसार होत असल्याचा ग्रामस्थानी केला आहे .

यापूर्वी गावात जाणाऱ्या रस्त्यावरील अडथळा ठरणारे अतिक्रमण तळणीचे सरपंच उध्दवराव पवार यांनी पूढाकार घेऊन काढल्यानंतर सिमेन्ट रस्ता काम मार्गी लागले. मात्र, देवठाणा – उस्वद रोडवरील अतिक्रमण रस्ता कामाला अडथळा ठरत असुन अतिक्रमणधारकांच्या चुकीच्या धोरण्यामूळे रस्ता काम अर्थवट अवस्थेत बंद आहे. पाऊस पडताच या रस्त्यावर चिखल निर्माण होत आहे . रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे . तात्काळ रस्त्यावरील अतिक्रमण काढून रखरले रस्ता काम पूर्ण करण्याची गरज असल्याचे शिवसेनेचे ज्ञानेश्वर ( माऊली )सरकटे यांनी सांगितले .

‘त्या’ अतिक्रमणधारकाविरूद्ध कारवाई – पो.नि. निकम

तळणीतील चौकात रस्त्यावर दुकाने मांडुन वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या जागेमालक व हातगाडे, टपरीधाराकाविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश तळणी बीट जमादार केशव चव्हाण यांना पो. नि. विलास निकम यांनी शनिवारी प्रत्यक्ष पाहणी करतेवेळी दिले होते .

व्यापाऱ्याची चर्चा – पवार

रस्ता कामासाठी अडथळा ठरणारे अतिक्रमण व्यापाऱ्यांनी स्वतः ह्या काढून घ्यावेत, प्रशासनाला सहकार्य करावे म्हणुन देवठाणा- उस्वद रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या व्यापा-यांशी चर्चा करून मार्ग काढू, असे तळणी सरपंच उद्धवराव पवार यांनी सांगितले .

विरोध नाही – चंदेल

रस्ता कामाला विरोध नाही . पण, देवठाणा- उस्वद रस्त्यावरील पुलाचा मध्यापासुन दोन्ही बाजूनी समान अतिक्रमण काढावे , अशी मागणी व्यापारी दारासिंग चंदेल यांनी केली .

कारवाई करणार – चव्हाण

तळणी चौकात अतिक्रमण करून वाहतूकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यावरील हातगाडे, टपरीवाले व अवैध भाडे वसुली करणाऱ्या जागा मालकाविरूद्ध कारवाई केली जाणार असल्याचे तळणी बीट जमादार केशव चव्हाण म्हणाले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक