Breaking News
जालना जिल्हा

जालना जिल्ह्यात रात्री पुन्हा रुग्ण संख्येत मोठी वाढ

५५ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर १३१ जणांचे अहवाल निगेटिव्ह

जालना न्यूज / गौरव बुट्टे

जालना जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार रात्री 8 :10 वाजता आणखी ५५ व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह तर १३१ जणांचा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या १९४६ वर पोहचली असून एकूण ६० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधित आढळून आलेल्या ५५ रुग्णांमध्ये जालना शहरातील मिशन हॉस्पिटल परिसर – ०३,भीमनगर चमडा बाजार – ०३,प्रशांत नगर – ०३, विठ्ठल मंदिर परिसर कसबा – ०३,जालना शहर – ०२,चरवाईपुरा – ०२,रामनगर – ०२,मराठा बिल्डिंग परिसर – ०२,आणि लक्कडकोट,समर्थ नगर,गणपती गल्ली,गुरुकृपा कॉलनी, हनुमानघाट,यशवंत नगर, विद्या नगर,चंदनझिरा, आझाद मैदान परिसर, म्हाडा कॉलनी शिवाजी नगर, गितांजली कॉलनी,शास्त्री मोहल्ला,सिव्हिल हॉस्पिटल परिसर,रेल्वे स्टेशन जवळील आनंदवाडी, देवमूर्ती,हिस्वन खु. प्रत्येकी एक रुग्ण तर बुटखेडा – ०६, केदारखेडा – ०४,खामगाव – ०२,गारखेडा परिसर औरंगाबाद – ०१, शहागड – ०१, साष्ट पिंपळगाव – ०१,पळसखेड ता.सिंदखेड राजा – ०१, कॉटन मार्केट मेहकर – ०३ अशा एकूण ५५ रुग्णांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक