भोकरदन तालुका

भोकरदनमध्ये साॅटसर्किटमुळे इलेक्ट्रॉनिक्स दुकानाला आग,लाखोचे नुकसान

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन शहरातील सिल्लोड रोडवरील कोर्टा समोर असलेल्या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला आग लागली. या आगीमध्ये जवळपास ३० ते ३५ टीव्ही,फर्निचर,इलेक्टीकल सामान,फ्रिज, यासह इतर साहित्य जळून खाक झाले. दुकानाला आग लागल्यामुळे २५ ते ३० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

अधिक माहीती अशी की भोकरदन शहरातील सिल्लोड रोड वर असलेल्या रेणुका इंटरप्रायजेस या इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानाला रविवारी मध्यराञी साॅटसर्किटमुळे आग लागली असल्याचे सांगण्यात येत असुन हा प्रकार दि.२७ जुलै सोमवार रोजी ४ वाजता दुकानच्या मागे राहात असलेले व्यापारी महादु शेठ डोभाळ यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी लगेच रेणुका इंटप्रायजेसचे मालक राजेंद्र कानडजे यांना फोनवरुन माहीती दिली व अग्निशामन दलालाही याची माहीती दिली.अग्निशामन दलाचे कर्मचारी ४:३० वाजता घटना स्थळी आग विझवण्यासाठी पोहचले पण तोपर्यंत सर्व दुकान आगीने खाक झाले होते.

या आगीत इलेक्ट्रॉनिकचे सर्व साहित्य जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले.
या आगीमध्ये जवळपास ३० ते ३५ टीव्ही,फर्निचर,इलेक्टीकल सामान,फ्रीज, यासह इतर साहित्य जळून खाक झाले. दुकानाला आग लागल्यामुळे २५ ते ३० लाख रूपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. आग लागल्याची माहिती मिळताच भोकरदन पोलिसांनी घटना स्थळी भेट दिली .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक