जाफराबाद तालुका

जीवरेखा धरण ओव्हर फ्लो…. शेतकऱ्यामध्ये समाधान

सन १९६५ मध्ये बांधलेले तालुक्यातील सर्वात मोठे धरण

कुंभारझरी/ज्ञानेश चव्हाण. दि.27 जुलै जाफ्राबाद तालुक्यातील अकोलादेव येथील जीवरेखा धरण हे तालुक्यात झालेल्या आतिवृष्टी व दमदार-मुसाळधार पावसाने

ओव्हर फ्लो झाले आहे. दरम्यान गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने वेळेवर हजेरी लावल्याने हे धरण तुडुंब भरल्याने परीसरातील अनेक गावांचा पिण्याचा पाणी प्रश्न मिटला आहे. शिवाय शेतीसाठीही पाणी उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांना मधुन समाधान व्यक्त केले जात आहे.
तत्कालीन मंत्री भगवंतराव गाढे यांच्या पुढाकारातून सन १९६५ मध्ये बांधले गेलेले हे जाफराबाद तालुक्यातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. ६.८९ दसलक्षघमी क्षमता असलेले हे धरण गतवर्षी केवळ ६० टक्के भरले होते. यापूर्वी सन २०१६ मध्ये हे धरण ओव्हर फ्लो झाले होते.


या धरणातून १६ हजार लोकसंख्येच्या टेंभुर्णी गावासह गणेशपूर, अकोलादेव, देळेगव्हाण, डहाकेवाडी, आंबेगाव, बुटखेडा, पोखरी आदी गावांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय धरणातून १७.६ कि.मी. लांबीचा कालवा काढण्यात आला असून या कालव्यातून अकोलादेव, पापळ, टेंभुर्णी, गणेशपूर, सावंगी, गोंधनखेडा आदी भागातील १२९९ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. धरण पुर्ण भरलेले आसल्यास रब्बी हंगामासाठी धरणातून तीन ते चार वेळ पाणी सोडले जाते. या हंगामात रब्बी हंगामासाठी पाणी मिळणार असल्याने धरण परिसरातील शेतकरी समाधानी दिसत आहे. याशिवाय धरणात वर्षभर मोठ्या प्रमाणात मत्स्य व्यवसाय चालतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक