बदनापूर तालुका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धाचा सन्मान

बदनापूर: प्रतिनिधी / किशोर सिरसाठ
बदनापूर: ता. 27 : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस निमित्त कोरोना परिस्थितीमध्ये विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या कोरोनायुद्धांचा बदनापूरात सोमवारी शिवसेनेच्यावतीने सत्कार व सन्मान करण्यात आला .

यावेळी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष सांबरे, उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, किसान सेना जिल्हा परिषद सदस्य भानुदास घुगे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य गणेश डोळस, पंचायत सभापती शीलाताई शिंदे, उपसभापती रवी कुमार बोचरे, शहराध्यक्ष राजू जऱ्हाड, शिवसेना तालुका मार्गदर्शक राजु बापू जऱ्हाड, शहर प्रमुख राजेंद्र , तालुका शिवसेना संघटक नंदकिशोर दाभाडे, तालुका संघटक पद्माकर पडूळ, गोरख लांबे, बळीराम मोरे, युवासेनेचे संपर्कप्रमुख कृष्णा कोल्हे सह कार्यकर्ते आदिंची उपस्थिती.

बदनापूरात कोरोना योद्धा म्हणून सर्व काही शासकीय कर्मचारी असतील डॉक्टर ,पोलीस, पत्रकार, शासकीय कर्मचारी, यांचा सर्वांचा सन्मानपत्र देऊन शिवसेनेच्यावतीने गौरव करण्यात आला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक