जालना जिल्हा

सोमवारी जालनासह ग्रामीण भागातही कोरोना बाधीत रुग्ण आढळले

संपादक /दिगंबर गुजर न्यूज जालना जालना जिल्ह्यात सोमवारी 93 वक्तीचा स्वब अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून यात शहरातील प्रशांत नगर-3, भीमनगर-3,विठ्ठल मंदीर कसबा-3, मिशन हॉस्पिटल जवळील-3,मराठा बिल्डिंग-2, रामनगर-2, चरवाईपुरा-2,गुरुकृपा कॉलनी-1, यशवंत नगर -1, समर्थनगर-1, विद्यानगर, मंठा रोड-1, चंदनझिरा-1, आझाद मैदान, म्हाडा कॉलनी-1, गीतांजली कॉलनी-1, शास्त्री मोहल्ला-1, लक्कडकोट-1, गणपती गल्ली-1, हनुमान घाट-1, सिव्हिल हॉस्टिपल-1, आनंदवाडी, राममंदिर-1, जालना शहर-34, बुटखेटा ता. भोकरदन-6, केदारखेडा ता. भोकरदन-4, कॉटन मार्केट, मेहकर-3, खामगाव-2, हिस्वन खुर्द ता. जालना-1 , साष्ट पिंपळगाव-1, शहागड-1, देवमुर्ती-1, गारखेडा औरंगाबाद-1, पळसखेड-1, ता. सिंदखेडराजा-1 अशा एकुण 87 रुग्णांचा स्वॅबचा व अँटीजेन तपासणीद्वारे 06 अशा एकुण 93 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. जालना शहरातील पाणीवेस परिसरातील रहिवाशी असलेल्या 75 वर्षीय महिला रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना दि. 17 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना          दि. 27 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 26 जुलै2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. अंबड  शहरातील  रहिवाशी असलेल्या 69 वर्षीय महिला रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना   दि. 18 जुलै 2020 रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या लाळेचा नमुना दि. 19 जुलै 2020 रोजी पॉझिटिव्ह प्राप्त झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच दि. 26 जुलै,2020 रोजी त्यांचा मृत्यु झाला. वाढेगाव ता. मंठा येथील रहिवाशी असलेल्या 58 वर्षीय पुरुष रुग्णास न्युमोनियाचा त्रास होत असल्याने त्यांना दि. 22 जुलै, 2020 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  त्यांच्या लाळेचा नमुना दि. 25 जुलै, 2020 रोजी प्राप्त झाला.  त्यांच्यावर उपचार सुरु असताना दि. 27 जुलै, 2020 रोजी मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. 40 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज – जालना शहरातील काद्राबाद- 14, मस्तगड-3, भाग्यनगर-1, पानीवेस -1, दर्गावेस-1, रुख्मिणी गार्डन-1, बदनापुर -1, पुंडलीक नगर-1, व्यंकटेश नगर-1, कसबा-1, मंगळबाजार-1, संभाजीनगर -3,  कचेरी रोड-1, आशिर्वाद नगर-4, मोदीखाना-2,  जालना शहर-2, धावडा -1, आन्वा-1 अशा एकुण 40 रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी सांगितले आहे कोरोना अपडेट जिल्ह्यात एकुण संशयीत रुग्ण-6942 असुन  सध्या रुग्णालयात-459 व्यक्ती भरती आहेत, एकुण भरती केलेल्या व्यक्ती-2682, दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या-236 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या लाळेच्या नमुन्यांची संख्या-11652 एवढी आहे. प्रयोगशाळेकडुन अनिर्णीत नमुने -50, दैनिक पॉझिटीव्ह नमुने–93 (ॲटीजेनसह) असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या-1950 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या-9411,रिजेक्टेड नमुने-39, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या-437 एकुण प्रलंबित नमुने-202, यशस्वी उपचारानंतर एकुण डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांची संख्या – 2252 एवढी असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अर्चना भोसले यांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक