भोकरदन तालुका

भोकरदन कोविड सेंटरमधून डिस्चार्ज रुग्णांतील ४ जनांचा अहवाल पॉझिटिव्ह!

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथिल कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १० जणांची अॅटिजन चाचणी निगेटिव्ह आली . त्यानंतर सर्वांना डिस्चार्ज देण्यात आला . पण प्रयोगशाळेकडून यातील चौघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे .

अधिक माहीती अशी की,भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे मागिल आठवड्यात ६५ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती . या महिलेच्या संपर्कातील दहा जणांना भोकरदन येथील कोविड सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते . मंगळवारी त्यांचे स्वब घेऊन प्रयोगशाळेत पाठविण्यात आले .पण पाच दिवस उलटूनही चाचणीचे नमूने प्राप्त होत नसल्याने रविवारी कोविड सेंटरच्या डॉक्टरांनी दहा जणांची अॅटिजन चाचणी केली .यात सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले . त्यानंतर सर्वांना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला . त्यांना डिस्चार्ज देऊन तीन तास होत नाही तोपर्यत या दहापैकी चार जणांचा अहवाल प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाला . यामुळे केदारखेडा गावात एकच खळबळ उडाली आहे आणि गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे बोलले जात आहे . दरम्यान , पॉझिटिव्ह आलेल्या चौघांना सोमवारी कोविड सेंटरमध्ये ठेवण्यात आले.

याबाबत वैद्यकिय अधिक्षक डाॅ.डि.एम.मोतीपवळे यांच्याशी दुरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता , प्रतिसाद मिळाला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक