Breaking News
भोकरदन तालुका

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पाचशे वृक्षांचे वाटप,सावंगी आवघडराव येथे रक्तदान शिबीर

मधुकर सहाने : भोकरदन

दिनांक २७ जुलै २०२० सोमवार.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीने वृक्षांचे वाटप करण्यात आले असून वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला.


सावंगी अवघडराव येथे ग्रामपंचायत तसेच शिवसेना शाखेच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीने इब्राहिमपूर येथील श्री गुरु गणेश गुरू मिश्री येथील गोशाळेत महादेव मंदिरावर तसेच श्रीकृष्ण मंदिरात रुद्राभिषेक करून आरती करण्यात आली व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी शहरातील अनेक भागात वृक्षारोपण करण्यात आले असून यासोबतच शेतकरी बांधवांना पाचशे झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराचे अध्यक्ष महेश पुरोहित शहरप्रमुख भूषण शर्मा युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तळेकर, ईश्वर इंगळे, सुरेश कचके, गणेश इंगळे ,विष्णू दळवी ,विठ्ठल पवार, रवी सुरसे, कृष्णा तराळ, यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.


तसेच अवघडराव सावगी येथे रक्तदान शिबीराचे उदघाटन करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख मनीष श्रीवास्तव ,शिवसेना तालुका प्रमुख नवनाथ दौड, स्व.बाळासाहेब ठाकरे स्मुती परिवार अध्यक्ष महेश पुरोहित , शिवसेना शहरप्रमुख भुषण शर्मा , युवासेना उपजिल्हाअध्यक्ष सुरेश पाटील तळेकर ,सरपंच सत्तार भाई, प्रकाश पाटील , पंडित पाटील ,व सर्व शिवसेना शाखा ,ग्रामपंचायत सदस्य सावंगी आदी उपस्थित होते.

भोकरदन येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्मृती परिवाराच्या वतीने शेतकर्यांना ५०० वृक्ष वाटप करण्यात आले,यावेळी अध्यक्ष महेश पुरोहित शहरप्रमुख भूषण शर्मा युवासेना जिल्हा उपाध्यक्ष सुरेश तळेकर, ईश्वर इंगळे, सुरेश कचके, गणेश इंगळे ,विष्णू दळवी ,विठ्ठल पवार, रवी सुरसे, कृष्णा तराळ, यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक