Breaking News
जालना जिल्हा

जिल्ह्यात अँटीजण चाचणीत 78 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह

न्यूज जालना (गौरव बुट्टे)

जालना शहरातील विविध भागात करण्यात आलेल्या अँटीजन चाचणीत 78 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या आता 2060 इतकी झाली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.

जालना नगर परिषद आणि आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील विविध भागात काही दिवसांपूर्वी अँटीजन चाचणी घेण्यात आली होती. या चाचणीत शहरातील 78 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात सर्वाधिक 6 रुग्ण हे चंदनझिरा भागातील असून त्यापाठोपाठ व्यंकटेश नगर मधील 5,गोपिकीशन नगर आणि पाणीवेस या भागातील प्रत्येकी 4, लक्कडकोट,कुंभार गल्ली,संभाजीनगर, काद्राबाद, प्रियदर्शनी कॉलनी,रामनगर पोलीस कॉलनी,मोदीखाना,जेईएस कॉलेज या भागातील प्रत्येकी 3,कोष्टी गल्ली,प्रयागनगर,गांधी चमन, बिहारीलाल नगर,आणि सरस्वती कॉलनी या भागातील प्रत्येकी 2 तर अग्रेसन नगर,साईनगर जालना, प्रीतीसुधा नगर,मियासाब दर्गा,प्रशांती नगर देवमुर्ती, दर्गावेस,आरपी रोड, मंगलबाजार, ग्रीनपार्क, आरपी रोड भाकडवाडा,मारवाडी गल्ली काद्राबाद,शिवाजी नगर म्हाडा,शिवाजी पुतळा, भीमनगर, कबाडी गल्ली, पोलासगल्ली, लक्ष्मीनारायनपुरा, नानक निवास,कसबा, पोस्ट ऑफिस जालना, जेठमल नगर, आणि समर्थनगर या भागातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक