जाफराबाद तालुका

देश-विदेशातील 285 जणांचा सहभागकारगील विजय दिनानिमित्त केले होते आयोजन

कलाबाई काळे फाउंडेशन च्या व्हर्चूयल रन/सायकलिंग स्पर्धेत आयोजन

टेंभुर्णी / सुनील जीशी
२६ जुलै हा दिवस संपुर्ण देशात कारगिल विजय दिन म्हणुन साजरा केला जातो. भारतीय सेनेची शौर्य कथा भारतीय इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहलेली आहे.भारतीय सैन्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माहोरा येथील कलाबाई काळे फाऊंडेशन ने आयोजीत केलेल्या व्हर्चूयल रन आणि सायकलिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.राज्यासह देश विदेशातील 285 जणांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला.

भारतीय सैन्याच्या शौर्याचा इतिहास प्रत्येकाच्या मनात राष्ट्रप्रेमाची प्रखर ज्योत प्रज्वलित करून रहावा म्हणून सदर स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.आपण जिथे आहोत त्या गावातून,शहरातून या स्पर्धेत सहभाग नोंदवता आला.कठुवा,कानपुर,विलासपुर, हैद्राबाद सह राज्यातील नाशिक, हिंगोली, पुणे, नगर, बुलढाणा,औरंगाबाद,जालना आणि विदेशातून दक्षिण आफ्रिकेसह अन्य देशातील स्पर्धकांनी ही सहभाग घेतला.


या स्पर्धेत रनींग प्रकारात प्रथम क्रमांक डॉ. राजेश्वर माचेवर यांनी पटकावला, देशासाठी शहीद झालेल्या सैनिकाच्या घरापासून रनींग सुरुवात करून २७ किलोमीटर ते धावले. तर दक्षिण आफ्रिका मध्ये स्थित भारतीय नागरिक शशिकांत ईरनाळे यांनी दुसरा क्रमांक पटकावला. विदेशातुन भारतीय सैनिकाच्या शौर्याला सलाम करत त्यांनी २५ किलोमीटर रनिंग केली. सायकलिंग मध्ये प्रथम क्रमांक श्री संतोष वाघ यांनी पटकावला,त्यांनी १६५ किमी अंतर कापले, तर महादेव ढाकणे यांनी १२५ किलोमीटर अंतर पार करत दुसरा क्रमांक पटकावला. सतिश यादव यांनी १०९ किलोमीटर अंतर कापुन तृतीय क्रमांक पटकावला.

रनींग व सायकलिंग या दोन्ही कॅटेगरी सहभाग झालेल्या श्री सतिश आन्वेकर यांनी हीक्रमांक पटकावला.या स्पर्धेचे ब्रॅंड अॅम्बेसिडर डॉ. प्रफुल्ल जटाळे यांच्या उत्तम मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पाडली गेली. स्पर्धेसाठी कलाबाई काळे कॅन्सर फाऊंडेशन चे प्रवर्तक तथा माजी सैनिक गजानन काळे, शेखर देशमुख, मंगेश हरणे, ज्ञानेश्वर मराठे यानी परिश्रम घेतले.

भारतीय सैन्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कलाबाई काळे फाऊंडेशन ने व्हर्चूयल रन आणि सायकलिंग स्पर्धेचे आयोजन केले होते.देश -विदेशातील 285 जण या स्पर्धेत सहभागी झाले होते.सर्व सहभागीना ई प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.आफ्रिका आणि अन्य देशात स्थित भारतीय नागरिकांनी ही या स्पर्धेत सहभाग घेऊन कारगील युद्धातील सैन्याप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या
गजानन काळे,कलाबाई काळे फाऊंडेशन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक