Breaking News
घनसावंगी तालुका

आवलगाव- राजेगाव मार्गाचे हाल बेहाल..!

राणीउंचेगाव/ प्रतिनिधी

घनसावंगी तालुक्यातील आवलगाव-राजेगाव हा घनसावंगी ला जोडणारा मुख्य मार्ग आहे, आवलगाव येतील ग्रामस्थांना शेती ,शासकीय,दवाखाने,विविध कामासाठी घनसावंगी येथे जावे लागते पण सततच्या पावसामुळे रस्त्यावरील खड्यात पावसाचे पाणी साचत आहे, अक्षरशः रस्त्याला जलमय स्वरूप आल्याने ग्रामस्थांना आणी येणाऱ्या-जाणऱ्यांना त्रास होत आहे.बऱ्याच टू व्हिलर ह्या अपघाताचा शिकार होत आहे.

याआधी पण निवेदन देऊन प्रशासन लक्ष घालत नाही, ग्रामस्थांनकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, लवकरात लवकर रस्त्याची डागडुजी करावी अन्यथा आम्ही आंदोलन करू असा ग्रामस्थांनी प्रशासनाला इशारा दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक