संपादकीय

कोरोनाच्या संकट काळात पत्रकारांनी स्वतःची काळजी घेत कर्तव्य पार पाडावे-प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे

न्यूज जालना ब्युरो : कोरोनाच्या संकट काळात पत्रकारांनी स्वतःची विशेष काळजी घेत आपले कर्तव्य पार पाडावे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वाधिक फटका वृत्तपत्र श्रुष्टीला बसला आहे. तर नव्या तंत्रज्ञानाच्या ऑनलाईन बातम्यांना सुगीचे दिवस आले आहेत. अर्थात वृत्तपत्रांवर आजही वाचकांचा विश्वास आहेच त्यामुळे भविष्यात पुन्हा वृत्तपत्रांना चांगले दिवस येतील. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांनी खचून न जाता उमेद कायम ठेवावी, असा आशावाद महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे यांनी मंगळवारी (ता. 28) दुपारी पत्रकार संघ आणि न्यूज जालनाच्या वतीने आयोजित फेसबुक लाईव्ह चर्चासत्रात पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, फेसबुक लाईव्ह चर्चासत्र उपक्रमाचे उदघाटन देखील श्री. मुंडे यांच्या चर्चासत्राने झाले. या उपक्रमाचे आयोजन न्यूज जालनाचे प्रमुख तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. पत्रकारांशी थेट ऑनलाईन संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे म्हणाले की, कोरोनाच्या काळात वृत्तपत्र क्षेत्रावर मंदीचे सावट असल्यामुळे कर्मचारी कपात किंवा वेतन कपात असे प्रकार होत आहेत. अर्थात हे दुर्दैवी आहे. या संदर्भात त्या – त्या वृत्तपत्र समूहाने आपल्या कर्मचाऱ्यांबाबत सहानुभूतीची भूमिका घ्यावी, आम्ही देखील या संदर्भात संबंधित वृत्तपत्र समूहांच्या प्रमुखांशी बोलत आहोत. कोरोनाच्या कालावधीत काम करणाऱ्या यंत्रणांना शासनाने विमा संरक्षण दिले आहे, त्याच धर्तीवर अशा महामारीत देखील जीवावर उदार होऊन लोकांपर्यंत वस्तुस्थिती मांडणाऱ्या पत्रकारांना विमा संरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडली , शासनाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून वृत्तसंकलन करताना कोरोनाने मृत्यू झाल्यास अशा पत्रकारांच्या कुटुंबांना विमा संरक्षण मिळेल, अशी घोषणा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. लोकशाहीचा चौथास्तंभ असलेले वृत्तपत्र क्षेत्र कोरोनाच्या काळात डबघाईस आलेला असल्यामुळे कार्यालयीन कर्मचारी आणि शहर व ग्रामीण भागात मानधन तत्वावर काम करणारे पत्रकार आर्थिक अडचणीत सापडले आहेत, अशा पत्रकारांच्या बँक खात्यावर पैसे टाकून शासनाने दिलासा द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सहभागी पत्रकारांनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, विधानसभेत पत्रकारांना प्रतिनिधित्व मिळावे, पत्रकारांसाठी शैक्षणिक अहर्ता आवश्यक करावी, अधिस्वीकृतीला मुदतवाढ द्यावी, ऑनलाईन न्युज पोर्टलला देखील शासनाने अधिकृत करावे, अशा मागण्या मांडत सविस्तर आणि सकारात्मक चर्चा केली.

बुधवारी ऍड रणजित शेडगे येणार फेसबुक लाईव्ह

महाराष्ट्र मराठी पत्रकार संघ आणि न्यूज जालनाच्या माध्यमातून आयोजित फेसबुक लाईव्ह चर्चसत्रात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खडपीठाचे विधिज्ञ ऍड. रणजित शेडगे बुधवारी (ता. 28) सायंकाळी साडेसात वाजता संवाद साधणार आहे. या फेसबुक लाईव्ह चर्चसत्रात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक