कोरोना पॉझिटिव्ह बातमीजालना जिल्हा

जालना जिल्ह्यात 2000 पार आणखी ३५ संशयित रुग्णांचे अहवाल पॉजिटीव्ह

जालना – गौरव बुट्टे
जालना जिल्ह्यात आज दि.२८ जुलै मंगळवार रोजी रात्री उशिरा आणखी ३५ संशयित रुग्णांचे अहवाल पॉजिटीव्ह प्राप्त झाले आहे.

काल मंगळवारी रोजी ८ संशयित रुग्णांचे अँटीजेन चाचणीचे अहवाल पॉजिटीव्ह प्राप्त झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या आता २०२५ इतकी झाली असून त्यापैकी १३२७ रुग्णांना जिल्हा रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिलीआहे.

जालना नगर परिषद आणि आरोग्य विभाग जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१४ ते २७ जुलै या दरम्यान जालना शहरात विविध भागामध्ये घेण्यात आलेल्या अँटीजन चाचणीत एकूण ७८ संशयीतांचे अहवाल पॉजिटीव्ह प्राप्त झाले आहेत.दरम्यान आज दि.२८ जुलै मंगळवार रोजी जालना येथील प्रयोगशाळे द्वारे एकूण ३५ संशयित रुग्णाचे अहवाल पॉजिटीव्ह प्राप्त झाले आहे त्यात जालना शहरातील पांगारकर नगर भागातील सर्वाधिक ५ रुग्णांचा समावेश असून त्यापाठोपाठ संभाजी नगर ४,बिहारीलाल नगर , शिवाजी नगर या भागातील प्रत्येकी ३ करवा नगर,जे ई एस कॉलेज जवळ प्रत्येकी 2,अंबड २ आणि नाडेकर चौक अंबड,बालाजी गल्ली परतूर,म्हाडा कॉलनी भोकरदन,जालना शहरातील संजय नगर,सुभाष चौक, जुना जालना,समर्थ नगर,अग्रेसनं नगर, पाणीवेस, मोदीखाना, गणेशपूर आणि पिरपिंपळ्गाव व कोठी ता.घनसावंगी येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक