Breaking News
जालना जिल्हा

अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा संपली-आज १ वाजता निकाल

जांबसमर्थ / कुलदीप पवार कोरोनामुळे महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्डाने नुकताच बारावीचा निकाल जाहीर केला होता.परंतु बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली होती. त्यामुळे आज बोर्डाने पत्रकार परीषद घेऊन निकालाची तारीख जाहीर करण्यात आली.त्या अनुषंगाने आज दिनांक २९ रोजी दुपारी एक वाजता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागणार आहे.देशात कोरोणाचे थैमान सुरू असल्याने शाळा, महाविद्यालय बंद आहे.कोरोणाच्मा काळात देशात नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आँनलाईन पद्धतीने झाली.मात्र,कोरोणामुळे राज्यात बारावी व दहावीचे निकाल खोळंबले होते. यामुळे पालकांसह विद्यार्थ्यांना निकालाची प्रतिक्षा होती.कोरोणाच्या वाढत्या प्रसारामुळे दहावीचा भुगोलचा पेपर रद्द करण्यात आला होता.कोरोणामुळे उत्तरपत्रिका तपासणीलाही अडचणी येत होत्या.त्यामुळे दहावीचा निकाल लांबला असून,३१ जुलैपर्यंत दहावीचा निकाल लागेल,असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले होते.त्यामुळे बोर्डाकडून दहावीच्या अखेर निकालाची तारीख अधिकृतपणे जाहीर झाल्यामुळे ग्रामीण भागातील‌ विद्यार्थ्यांकडुन आनंद व्यक्त केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक