जालना जिल्हा

जालना क्वारंटाईन सेंटरप्रकरणी प्राचार्यांवर गुन्हा

न्यूज जालना ब्युरो : औरंगाबाद रोडवरील शासकीय तंत्रनिकेतन येथे असलेल्या करन्टाईन सेंटरमध्ये अस्वच्छता विद्युत व्यवस्था न केल्याने नोडल अधिकारी असलेल्या प्राचार्यांविरुध्द चंदनझिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शासकीय तंत्रनिकेतन येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये नोडल अधिकारी म्हणून तेथील प्राचार्य सी . एस . थोरात यांची नेमणूक करण्यात आलेली आहे . दि . १५ ते २३ जुलै या काळात त्याठिकाणी स्वच्छता आणि विद्युत व्यवस्थेमध्ये त्रुटी होत्या . त्यामुळे असलेल्या रुग्णांची गैरसोय झाली .

याप्रकरणी कर्तव्यात व जबाबदारी पार पाडण्यात जाणीवपूर्वक कसूर केल्याची फिर्याद जालना येथील तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी दिली आहे . त्यानुसार प्राचार्य थोरात यांच्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

(फोटो प्रतिकात्मक)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक