भोकरदन तालुका

जालना जिल्ह्यातील शिक्षकांनी काढली प्रचलित अनुदानासाठी औरंगाबाद ते मुंबई पायी दिंडी

मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15/11/2011 च्या शासन निर्णय नुसार प्रचलित नियमाने अनुदान देण्याबाबत शिक्षक संघटनेची अन्नत्याग पायी दिंडी

कुंभारझरी/ज्ञानेश चव्हाण.

दि.29.जुलै राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सर्व शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे 15/11/11 च्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळणे त्याचबरोबर विनाअनुदानित अंशत अनुदानित अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण.या दोन प्रमुख मागण्या करिता नवयुग क्रांती शिक्षक संघटनेच्या वतीने क्रांती चौक औरंगाबाद ते मुंबई विधान भवन मुख्यमंत्री निवास राज्यपाल शिक्षण मंत्री निवासस्थान येथे अन्नत्याग पायी दिंडी चे आयोजन केले आहें.

अन्नत्याग पायी दिंडी चा तिसरा दिवस पहिल्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज क्रांती चौक औरंगाबाद येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायथ्याचे पूजन करून औरंगाबाद ते दहेगाव येथे आगमन झाले.


दिनांक 29 जुलै ला दहेगाव पासून पायी दिंडी मुंबई मंत्रालयाकडे निघाली आहे राज्यातील 20 टक्के अंशतः अनुदानित शाळा 1628 या 1/2 जुलै या शाळा शंभर टक्के अनुदानावर असताना 20 % सरसकट अनुदान देण्यात आले. त्यामुळे आज या शाळेतील शिक्षक निवृत्त होत आहे आत्महत्या करताहेत त्यामुळे त्या शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे 15/11/11च्या शासन निर्णयानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन प्रति नित्यनेमाने अनुदान द्यावी त्याचबरोबर 13 सप्टेंबर 2019 च्या शासन निर्णयातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक 1658 146घोषित, अघोषित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक नैसर्गिक तुकडी निधी सहित घोषित करून प्रचलित नियमानुसार मंत्रिमंडळात निर्णय घ्यावा.


तसेच अतिरिक्त शिक्षकांना सेवा संरक्षण द्यावी वरील मागण्या मान्य करा. 15-15 वर्षापासून विनावेतन काम करत असलेल्या शिक्षकांना न्याय द्यावा जोपर्यंत न्याय मिळत नाही आमचा जीव गेला तरी आम्हाला परवा नाही याची शासनाने नोंद घ्यावी.आम्ही आता कोणत्याही परिस्थिती मध्ये मागे हटणार नाही असा कडक इशारा नवयुग क्रांती शिक्षक संघटनेचे अध्यक्ष गजानन खैरे यांनी दिला आहें.


या अन्न त्याग दिंडी मध्ये आजच्या तिसऱ्या दिवशी शिक्षक गजानन खैरे आणि अनिस कुरेशी यांची प्रकृती खालावल्याची माहिती हाती येत आहें.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक