भोकरदन तालुका

गणपतीच्या मूर्तीविक्रेत्यांवर कोरोणाचे सावट

पिंपळगाव रेणुकाई प्रतिनिधी

गणेश उत्सवाला पुढच्या महिन्यात सुरुवात होणार आहे . मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश उत्सवाची तयारी पूर्वीसारखी नसून मूतीकारांवरही चिंतेचे सावट आहे . कमी उंचीच्या आणि अगदी कमी संकेत मूर्ती तयार करुन ठेवल्या जात आहे . मात्र वेळेवर काय होणार याची भीतीही मूर्तीकाराना सतावत आहे. यावर्षी उत्सवाच्या काळात कोरोणाचे संकट राहणार असल्याने उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे

त्यानुसार मूर्तिकारांनी हा धोका लक्षात घेऊन कमी उंचीच्या मूर्ती तयार करण्यास प्रारंभ केला आहे . गणेश उत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा
उत्सव आहे परंतु यंदा गर्दी न करण्याच्या सूचना असल्याने या उत्साहावर परिणार होणार आहे. पिंपळगाव सह अन्य लहानमोठया गावांमध्ये मूर्तीकार गणपतीच्या मूर्ती तयार करीत आहे . २२ ऑगस्टला घटस्थापना आहे .

त्यामुळे परीसरातील काही मूर्तिकारांनी तयारी सुरु केली आहे . मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी मूर्ती बनविण्यासाठी ऑर्डरही कमी असल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे.काही मूर्तीकारांनी उपलब्ध साहित्यावर मूर्ती बनवण्यासाठी सुरुवात केली आहे.कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती , मजुरी , वाहतुकीच्या खर्चात झालेली वाढ. याचा परिणाम मूर्तीच्या किंमतीवर होणार आहे .

या व्यवसायावर कुटुंबाची उपजिविका चालत असल्याने मूर्तीकार हतबल आहे . गणेशोत्सवाची चाहूल लागली असतानाच सारे कोरोनामुळे चिंतेत आहेत . मूर्ती सुबक आणि आकर्षक दिसाव्यात म्हणून सोनेरी , लाल , हिरवा , पिवळा इ . रंगाचे मिश्रण एकत्रित करून त्या सजविल्या जातात . मात्र यावर्षी मूर्तीच्या सुबकतेवरही परिणाम पडण्याची शक्यता आहे .

मागील काही वर्षांच्या तुलनेमध्ये यावर्षी मूर्ती तयार कण्याची आर्डर अगदीच कमी आहे . कोरोनाच्या सावटामध्ये मूर्ती तयार केल्या जात आहे . मात्र वेळेवर काय होणार , हे सांगता येत नाही . लॉकडाऊन आणखीच वाढला तर या उत्सवावर परिणाम होणार आहे . त्याचे नुकसान आमच्यासारख्या व्यावसायिकांवर होणार आहे . घरगुती आणि सार्वजनिक गणेश मूर्ती यावर्षी कमीच बसतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे . शासनाने मूर्तीकारांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे . दुसरीकडे माती , रंग आदींचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले आहे . त्यामुळे या व्यवसायवर पोट भरणे कठीण होत आहे .

रतन सिल्लोडे , मूर्तीकार पिंपळगाव रेणुकाई

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक