जालना जिल्हा

युरिया खताची चढ्या भावाने विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करा


परतुरात शेतक-यांची मागणी
दिपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क
परतूर परिसरातील व शहरातील खत विक्रेते शेतक-यांना युरीया खताची गरज असताना चढ्या भावाने विकत असून कृत्रिम टंचाई निर्माण करीत आहेत. युरिया खत उपलब्ध असतानाही जाणीवपूर्वक नाही असे सांगून 266 रुपये कीमतीचे खत बॅग जास्त भावाने विकत आहेत. किंवा आधार लिंकिंग करून इतर न विकनारे खत बँग जास्त नफा असणारे युरिया खत बॅग सोबत बळजबरीने दिले जात आहे. चढ्या भावाने खताची विक्री करणाऱ्या कृत्रिम टंचाई टंचाई निर्माण करणा-या दुकानदारावर तात्काळ कायदेशीर कार्यवाही करून गुन्हे दाखल करण्याची मागणी परतूर तहसिलदार यांना शेतक-यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

दिलेल्या निवेदनावर विकास प्रकाशराव खरात, गणेश सर्जेराव ढवळे, शञुघ्न कणसे, महेश रामेश्वर नळगे, प्रवीण लक्ष्मणराव डुथृकरे, संतोष जनार्धन शेजुळ, दत्ता सुरुंग , विकास झरेकर ,सचिन खरात ,शुभम कठोरे, राहुल अंभोरे ,विष्णू मचाले, भरत शिंदे व सचिन मस्के यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक