परतूर तालुका

परतूरच्या आनंद शाळेचे घवघवीत यश


परतूर: प्रतिनिधी
येथील आनंद शाळा परतूर चा निकाल सलग 5 व्या वर्षी 100% लागला आहे. शाळेची आदिती विष्णू तरासे हिने 97.80 टक्के गुण घेऊन शाळेतून प्रथम क्रमांक पटकावला , श्रुती नाथराव खवल 95.80 द्वितीय क्रमांक मिळवला तर 94.60 इतके समान गुण घेऊन श्रद्धा दिनेश खुदभयै व अभिमन्यू अशोक कोरडे यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
या शाळेतून 90% पेक्षा जास्त गुण घेऊन – 12 विद्यार्थी, 80% पेक्षा जास्त गुण घेऊन – 28 विद्यार्थी, 70% पेक्षा जास्त गुण घेऊन – 07 विद्यार्थी, 60% पेक्षा जास्त गुण घेऊन – 02 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. अशी माहिती संजय व्यवहारे यांनी दिली.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष एकनाथ कदम मुख्याध्यापिका सत्यशीला तौर – कदम , मुख्याध्यापक संजय कदम व सर्व शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.


या वेळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प.जालना श्रीमती गरुड यांनी प्रथम आलेल्या आदिती विष्णू तरासे हिचा सत्कार केला यावेळी श्रीमती गरुड सोबत गटशिक्षणाधिकारी मा.साबळे, संजय कदम , पालक विष्णू तरासे, संस्था अध्यक्ष एकनाथ कदम यांची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक