बदनापूर तालुका

काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयाचे दहावीच्या निकालात घवघवीत यश.


काजळा/प्रतिनिधी(भगवान धनगे)दि 29
बदनापूर तालुक्यातील काजळा येथील प्रतिभा माध्यमिक विद्यालयचा इयत्ता १० वीचा निकाल 95.00% लागला असून यशस्वी निकालाची परंपरा विद्यालयाने कायम ठेवली आहे.


मार्च २०२० मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत विद्यालयाचे 70 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.त्यापैकी 15 विद्यार्थी विशेष प्राविण्यसह,31 विद्यार्थी प्रथम श्रेणीत तर द्वितीय श्रेणीत18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विद्यालयातुन प्रथम क्रमांक कु.नाजिया बिबनखाँ पठाण (90.00%),द्वितीय कु.रितू बबन चांदगुडे (83.40%)तर तृतीय क्रमांक राम किसन मदनुरे (80.40%)याने मिळवला.


या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव श्री सुदामभाऊ शिंदे,पूर्ण संचालक मंडळ,गावचे सरपंच,उपसरपंच,पो.पाटील,चेअरमन,पालक विद्यालयाचे मुख्याध्यापक सूर्यकांत गुजर,दगडू पठाण,दत्तात्रय मुळे, भगवान धनगे,सुनील पाटील,लक्ष्मण कुऱ्हाडे,दीपक परजने, प्रवीण गावडे,मिलिंद उनवणे,योगेश टेके,प्रभाकर कोळेकर,तसेच गावकरी आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक