Breaking News
जालना जिल्हा

नूतन वसाहत भागातून ६२ हजराची दारू जप्त; दोन महिलांविरुद्ध गुन्हा


न्यूज जालना ब्युरो – पोलीस अधीक्षक कार्यालयातील अवैध दारूबंदी विशेष पथकाने बुधवारी (ता.२९) नूतन वसाहत भागात दोन ठिकाणी धाडी टाकून 62 हजार रुपये किमतीची देशी-विदेशी आणि गावठी दारू जप्त केली आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात दोन महिलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूबंदी विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संपत पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी विश्वनाथ भिसे, राजेंद्र वेलदोडे, राम पव्हरे, दीपक पाटील, रवी मेहेत्रे, अलका केंद्रे, रत्नमाला एडके, चालक धोंडीराम मोरे यांनी आज नूतन वसाहत भागातील विद्युतनगात आणि आनंदनगर या भागातील दोन गावठी दारूच्या अड्ड्यावर धाडी टाकल्या.

यावेळी विद्युतनगर येथील महिलेच्या मालकीच्या गावठी दारूच्या अड्ड्यावरून गावठी दारूसह देशी दारू, असा ४५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर आनंदनगर भागातील महिलेच्या ताब्यातून १६ हजार रुपये किमतीची गावठी, देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी कदीम जालना पोलीस ठाण्यात वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक