Breaking News
भोकरदन तालुका

सरस्वती विद्या मंदिर शेलुद शाळेचा १०वी चा निकाल ९८.७८%.

भोकरदन न्यूज सरस्वती विद्या मंदिर शेलुद शाळेचा इ.१०वी चा निकाल ९८.७८% लागला आहे यात सन-२०१९-२० या शैक्षणिक वर्षाचा इ.१०वीचा निकाल ९८.७८%इतका लागला.परीक्षेस एकूण ८२ विद्यार्थी बसले होते पैकी ८१विद्यार्थी उत्तीर्ण झाले.यामध्ये प्रथम क्रमांक- भागवत पंढरीनाथ बारोटे याने ९३.००%गुण मिळविले.द्वितीय क्रमांक-कु.प्रतिभा किरण खडके हिने ९२.००%गुण मिळविले.तृतीय क्रमांक-महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे भोकरदन सचिव बाळकृष्ण उबाळे यांचे चिरंजीव किरण बाळकृष्ण उबाळे याने ९१.८०%गुण मिळविले.
या गुणवंत विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचे शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र नारायणराव वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. शाळेतील ०९ विद्यार्थी मेरिट मध्ये ऊत्तीर्ण झाले.सर्व ऊत्तीर्ण आणि गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळेचे संस्थापक अध्यक्ष भगवानराव पाटील वाघ,अध्यक्ष विश्वासराव पाटील वाघ,सचिव देविदास पाटील यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक