जाफराबाद तालुका

श्री महेश शिक्षण संस्थाने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार.

कुंभारझरी/ज्ञानेश चव्हाण.

जाफराबाद तालुक्यातील टेम्भुर्णी येथील शेठ एकनाथ भगवानदास काबरा मराठी विद्यालय टेंभुर्णी च्या शाळांने यशाची परंपरा कायम राखत या वर्षी शाळेचा निकाल अपुतपूर्व लागला असून एकूण 39 विद्यार्थी पैकी 39 विध्यर्थी पास झाले.असून शाळेचा निकाल 100% लागला.

त्यापैकी प्रथम क्रमांक कु रोहिणी कैलास जमधडे.85.40% दुसरा क्रमांक.कु संगीता कैलास गायकवाड.84.80% तृतीय क्रमांक. रेणुका ठमाजी भागवत.83.20% तर इतर सर्व विध्यर्थी विशेष प्राविण्य सह उत्तीर्ण झाले आहे.
वरील सर्व गुणवंत विद्यार्थीचे श्री महेश शिक्षण संस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. या वेळी संस्थेचे अध्यक्ष देवराव देशमुख सचिव नंदलाल काबरा कोषाध्यक्ष प्रेमसुख काबरा. संचालक प्रा दत्ता देशमुख संचालक ठमाजी भागवत मु अ ज्ञानेश्वर सुरुशे सह सर्व संचालक मंडळाने सर्व गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले.


या यशामध्ये शाळेचे मु अ ज्ञानेश्वर सुरुशे सह शिक्षक गजानन कोरडे अनिल देशमुख रवींद्र साळवे शकील तडवी काळे मॅडम संतोष पवार रामेशवर सांगळे मधुकर देशमुख संतोष उगले शिवराज मस्के नंदकिशोर लहाने ज्ञानेश्वर मुळे शिवाजी सवडे रामेश्वर जोशी इत्यादि ने मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक