परतूर तालुका

त्या दहा वर्षीय मुलाचा आढळला मृत्यदेह


बालाजी गिरी/आसनगाव न्यूज- (ता परतूर)
परतूर तालुक्यातील आसनगाव येथे आईसह राहत असलेला दहा वर्षीय मुलगा शिवराज सोळके दि 28 जुलै पासून बेपत्ता होता गुरुवारी 30 जुलै वाजता सकाळी गावाजवळील मळ्यात असलेल्या विहिरीत शिवराज चा मृत्यदेह दिसून आल्याने एकच खळबळ उडाली
पाय घसरून विहिरीत पडला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत असून याबाबत आष्टी पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व जवळच एका बाजूला शवविच्छेदन करण्यात आले सायंकाळी चार च्या सुमारास शोकाकुल वातावरनात गावात अत्यसंस्कार करण्यात आले याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून पुढील तपास पोलीस करीत आहेत .तर ह्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक