घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात या ठिकाणी आढळले सहा जण कोरोना पॉझिटिव्ह

घनसावंगी न्यूज

घनसावंगी तालुक्यात सहा जणांचे अहवाल गुरुवारी तीन वाजता पॉझिटिव्ह आले असून यात रांजनी गावातील चार तर राणी उच्चेगाव एक चिंचोलीत एक असे एकूण सहा जणांचे अहवाल गुरुवारी प्रयोगशाळेकडून पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.

घनसावंगी तालुक्यात परत आता कोरोनाने एन्ट्री केलेली असून सर्वावर घनसावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ नागेश सावरगावकर यांनी सांगितले आहे.

आतापर्यंत तालुक्यात एकूण 48 रुग्ण कोरोना बाधित झालेले आहेत यात 3 जणांचा मृत्यू तर 13 जण ऍक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती सावरगावकर यांनी न्यूज जालना शी बोलताना दिली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक