Breaking News
जालना जिल्हा

जिल्ह्यात आज 27 नवीन कोरोना बाधीत रूग्णांची भर

जालना न्यूज ब्युरो दि 30- जालना जिल्ह्यात आज गुरुवारी सायंकाळी आणखी 27 संशयीत रुग्णांचे अहवाल कोरोना बाधीत आढळून आले आहेत. या रुग्णवाढीमुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रूग्णांची एकूण संख्या आता 2148 इतकी झाली असून त्यापैकी काल बुधवार पर्यंत 1360 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे अशी माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.

आज दुपारी 3 वाजता आलेल्या प्रयोग शाळेकडून अहवाला नुसार 27 कोरोना बाधीत रुग्णांपैकी 10 रुग्ण हे जालना शहरातील असून 17 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत.त्यात जालना शहरातील भवानी नगर भागातील 3 रुग्णांचा समावेश असून तेरापंथी भवन,दानाबाजार, कदिब मोहल्ला, जुनी बजरंग दालमिल आणि जागडा नगर या भागातील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात रांजनी येथील 4,अकोला तांडा ता.जाफराबाद 3, अंबड शहर 4,शहागड 3, साष्ट पिंपळगाव 2 आणि चिंचोली येथील एका रुग्णाचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक