अंबड तालुका

अंबड तालुक्यात ह्या गावात 9 जण पॉझिटिव्ह

न्यूज अंबड ब्युरोअनिल भालेकर

अंबड शहरासह अंबड तालुक्यातही कोरोना रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याचे गंभीर परिस्थिती पहावयास मिळत आहे. आज दिनांक 30 जुलै रोजी शासकीय प्रयोगशाळा कडून मिळालेल्या अहवालानुसार अंबड शहरात 4, शहागड येथील 3,तर सास्टे पिंपळगाव येथील 2 रुग्ण कोरूना आढळून आल्याने एकच दिवशी 9 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

अंबड शहरातील तर एका प्रतिष्ठित व्यापार्‍याच्या घरातील तीन जण कोरोनाबाधीत आढळले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अंबड शहरासह तालुक्यातील सर्वसामान्यांनी सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून आवश्यकता असल्यासच घराच्या बाहेर पडणे आता गरजेचे आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक