जालना तालुका

जि‌.प. श्री चैतन्यपुरी विद्यालय उटवद येथे मुलींना सायकलचे वाटप

बबनराव वाघ, उपसंपादक

न्युज जालना : जालना तालुक्यातील उटवद येथील जि.प‌.श्री चैतन्यपुरी विद्यालय उटवद येथील मुलींना मानव विकास मिशन योजने अंतर्गत सायकलचे वाटप करण्यात आले अाहे.या मध्ये विद्यालयातील दहा विद्यार्थीनींना सायकल वाटप करण्यात आल्या आहेत़ यात सावित्री रोडगे,प्रतिभा शिंदे,प्रयाग शिंदे,पुजा मोरे, अनुराधा घाडगे, वैशाली पांडुळे,भारती चौधरी,पुजा पांडुळे,कोमल चव्हाण,आरती कोरडे या मुलींना सायकलचे वाटप करण्यात आले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजाभाऊ शिंदे, सदस्य गणपत शिंदे,राजु जाधव,पालक नामदेव शिंदे,राजु चौधरी, प्रभाकर शिंदे, मनोहर मोरे, एकनाथ रोडगे व मुख्याध्यापक ढवळे सर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक