जालना जिल्हाभोकरदन तालुका

भोकरदन शहरात ३ नवीन रुग्न पॉझिटिव्ह ,भोकरदनकरांनी काळजी घेण्याची गरज

मधुकर सहाने : भोकरदन

गेल्या दोन तीन आठड्यापासुन एकही नवीन रुग्ण समोर न आल्याने काहीअंशी सुटकेचा निश्वास सोडलेल्या भोकरदन शहरात तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. खंडोबा मंदिर,प्रशात गल्ली,जाफराबाद रोड परिसरातील भागात हे रुग्ण आढळून आले. हे तिनही जण हे कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याने यांचेही कोरोना रिपोट पाॅझिटिव आल्याचे सांगण्यात येत आहे.

दि.२९ जुलै रोजी आढळून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये खंडोबा मंदिर येथील कोरोनाबाधित सेवानिवृत्ती शिक्षक ,सह प्रशात नगर,आणि जाफराबाद रोडवरील यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे,खंडोबा गल्ली,प्रशाद नगर,तसेच जाफराबाद रोडवरील आढळलेल्या कोरोना पेशंटच्या आवती भोवती सिल करण्यात आले असुन, परिस्तिती नियंत्रणात राहण्यासाठी प्रशासनाच्या वतीने काळजी व सुरक्षित राहाण्यासाठी सांगण्यात येत आहे.

भोकरदन शहरातील या कोरोना बाधित यांच्या संपर्कातील नागरीकांना काॅरांटाईन सेंटरला काॅरंटाईन करण्यात आले आहे,भोकरदन शहरातील तसेच तालुक्यातील नागरीकांनी सतर्क राहुण काळजी घ्यावी अशी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक