Breaking News
लातुर जिल्हा

आजीसाठी ती सर्वकाही, आजीच्या कष्टाचं चीज,सहाव्या वर्षीच हरवले वैष्णवीच्या मायेचं छत्र

बबनराव वाघ, उपसंपादक

न्युज चाकूर (लातूर) : बाल वयातच आई वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे मावशी व आजी आजोबांनी बार्शीच्या वैष्णवीचा सांभाळ केला. हीच वैष्णवी उल्हास पोटे चाकूरच्या जगत् जागृती विद्या मंदिरातून दहावीला ९८ टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

बार्शी येथे वैष्णवीच्या सहाव्या वर्षी आई रंजनाचा मृत्यू झाला तर वडील उल्हास दहा वर्षाची असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे अहमदपूर येथील योजना मलशेट्टे या मावशीने यशवंत विद्यालयात पहिली ते चौथी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. तर पाचवीपासून दहावीपर्यतचे शिक्षण चाकूर येथील जगत् जागृती विद्या मंदिरात आजी सुशिलाबाई व आजोबा विश्वनाथ शेटे यांनी पुर्ण केले. आई वडिलांचे छत्र हरवलेल्या वैष्णवीने असा शैक्षणिक प्रवास करत शालांत प्रमाणपत्र परिक्षेत नेत्रदीपक यश मिळवत अठ्यान्नव टक्के गुण घेतले आहेत. 

आई बाबा मी पास झाले हे सांगण्यासाठी आई वडील नाहीत, म्हणून ती खचली नाही. तर आजी आजोबा व मावशीच माझ्यासाठी सर्वस्व आहेत, असे ती म्हणते. भविष्यात डाॅक्टर होऊन पैसे कमावण्याला प्राधान्य न देता ते एक सामाजिक कार्य आहे. असा पायंडा पुन्हा एकदा समाजात निर्माण होण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचे मोठ्या अभिमानाने वैष्णवीने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक