भोकरदन तालुका

स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कुलचा शंभर टक्के निकाल

मधुकर सहाने : भोकरदन

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षण मंडळाच्या जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात भोकरदन येथील स्वामी विवेकानंद विद्यालय व रामेश्वर इंग्लिश स्कुल या शाळेंचा निकाल शंभर टक्के लागला असून स्वामी विवेकानंद विद्यालयात अनुष्का मैंद 95.20% प्रथम, योगिता बर्डे 94.00% द्वितीय, निकिता बर्डे 92.80% तृतीय क्रमांक मिळवला असून रामेश्वर इंग्लिश स्कुल मध्ये साईनाथ सुसर 89.60% प्रथम,अविनाश देवरे 87.00% द्वितीय तर ऋषि सपाटे 86.00% तृतीय क्रमांक मिळवला आहे. शाळेचे 14 विध्यार्थी 90.00% पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहे. विशेष म्हणजे सलग सहा वर्षांपासून शाळेचा निकाल शंभर टक्के लागत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉ आशिष पाटील, डॉ.सीमा पाटील, मुख्याध्यापक अजिंक्य पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक