भोकरदन तालुका

लिंगेवाडी पुलावरुन एक तरुन वाहुन गेला,तरुणाला शोधण्यासाठी प्रशासनाला अपयश

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथिल पुलावरुन पाणी वाहत असल्याने एका तरुनाने मोटारसाईकल नेत असतांनी प्रवाहासोबत वाहुन घेल्याची घटना भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी गावातील पुलावर घडली.

अधिका माहीती अशी की,भोकरदन तालुक्यातील लिंगेवाडी येथिल पुलाची उंची कमी असल्याने या प्रवाह असल्यास या पुलावरुन पाणी मोठ्या प्रमाणात वाहात असते,पण या प्रवाहाचा अंदाज न आल्यामुळे समाधान लक्ष्मण भोसले वय ३० रा.आडगाव ता.सिल्लोड हा लिंगेवाडी गावात जात असतांनी हा तरुण वाहुन घेला आहे,सदरील घटना दि.३० जुलै रोजी दुपारी ३ च्या सुमारास घडली.

घटनेची माहीती ग्रामस्थांनी अग्निशामन दलाला कळवली पण गाडी उशिरा आल्याने राञी ८ वाजेपर्यंत या तरुनाचा शोध घेवुनही सापडला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक