मंठा तालुका

बीबी गावाच्या रस्त्यासाठी ग्रामस्थाचा संघर्ष !१ कि. मी रस्ता : पावसाळ्यात रस्ता चिखलमय !

न्यूज तळणी(ता मंठा) : बिबी ( सेवली, ता. जालना ) गावाला जाडणाऱ्या १ कि. मी रस्त्याच्या डांबरीकरणासाठी ग्रामस्थांना स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरही संघर्ष करावा लागत आहे . रस्त्याचे डांबरीकरण लवकर व्हावे, या मागणीचे निवेदन जालना जिल्हाधिकारी व प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कक्षाला ( ता. २२ ) रोजी देण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकट काळात ग्रामीण अर्थव्यवस्था टिकविण्याची दळवळणाचे मार्ग चांगले असेल तर शेतीमाल वाहतूक , शिक्षणासाठी विदयार्थ्यांना प्रवासासाठी , आजारी रुग्णाना ये- जा करण्यासाठी सोईचे ठरते. मात्र, स्वातंत्र्यानंतरही सेवली- राहेरी मार्गावरील बिबी गावाला जाडणाऱ्या १ कि . मी रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. ८ महिन्यापूर्वी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. रस्त्यावर खडी येऊन पडली आहे . मात्र, प्रत्यक्ष कामाला सुरवात झाली नाही. संबंधित गुत्तेदाराने कागदोपत्री काम केल्याचे दाखवुन निधी हडपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

आंदोलन करणार …-सदर रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करावे , अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थ दिलीप अंबादास डोळे , समाधान उद्धव डोळे यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाव्दारे दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक