Breaking News
घनसावंगी तालुका

सोशल डिस्टन्स व विनामास्क फिरणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई

तिर्थपुरी/प्रतिनिधी

तीर्थपुरी येथे सोशल डिस्टन्स व विनामास्क फिरणार्‍या नागरीकांवर दंडात्मक कारवाई.शासनाने कोरोना विषाणू प्रसारण प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून नागरीकांना सोशल डिस्टन्स व तोंडाला मास्क/हातरुमाल वापरण्याचे आवाहन केले होते.

त्या अनूषंगाने आज दि.30 रोजी तीर्थपुरी ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन तीर्थपुरी यांच्या संयुक्त विद्यमाने तीर्थपुरी येथे स.पोलीस निरिक्षक गजानन कौळासे, व ग्रामविकास अधिकारी गजानन मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टन्स उल्लंघन व तोंडाला मास्क/हातरुमाल न बांधणार्‍या एकुण 123 नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन,एकूण 12300₹. दंडात्मक रक्कम वसुल करण्यात आली.सदर कार्यवाही मध्ये पो.हे.श्री.कंटुले, पो.हे. श्री.दाभाडे, ग्रा.पं.कर्मचारी सोपान कडूकर, विकास साबळे, आकाश नारळे, किशोर जाधव, गणेश मोरे, राजू कडुकर, दत्ता वाघ, जितेंद्र गाडेकर, डिगांबर जवळकर, ज्ञानेश्वर मोरे आदी सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक