जाफराबाद तालुका

आकोला तांडा येथील 3 ,बूटखेडा येथील 4 व किनी 1 जण कोरोना बाधित


अकोलादेव/ बि. डी. सवडे

जाफराबाद तालुक्यातील आकोलादेव तांडा येथील एकाच कुटुंबातील तीन जण तर जवळ असलेल्या किनी येथील एक बूटखेडा येथील क्वारंणटाईन केलेले 4 जण कोरोना बाधित आढळून आल्याने परिसरातील ग्रामीण भागात खळबळ उडाली आहे.

आकोला तांडा येथील संबंधित कुटूंबाकडे जालना येथून पाहुणे आले होते.ते परत गेल्यानंतर संबंधित कुटुंबातील व्यक्तींना त्रास जाणवू लागल्याने त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांचे दिनांक 29 जुलै रोजी त्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले.

त्यानुसार आरोग्य विभागाच्या वतीने संपूर्ण आकोला तांडा होम क्वारंणटाईन करण्यात आला. व आकोला तांडा येथील 8 व्यक्तींना जालना येथे पाठवण्यात आले यावेळी आकोला तांडा व कीन्ही व बूटखेडा या तिन्ही ठिकाणी डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ आर एस बागुल,आरोग्य सेविका ठोबरे,ग्रामसेवक ताबीले व टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे सपोनि श्री पायघन ,वैद्य आदींनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक