Breaking News
जाफराबाद तालुका

टेंभुर्णी येथील प्राचार्य डी. आर. भालेराव शुक्रवारी सेवा निवृत

कुंभारझरी/ज्ञानेश चव्हाण. जाफराबाद तालुक्यातील जे बी के विद्यालय चे मुख्याध्यापक तथा प्राचार्य डी. आर. भालेराव हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. ते शाळेत 26/07/1988रोजी रुजू झालेत.


इंग्रजी विषयांचे उत्कृष्ट अध्यापक असून, त्यांचं त्या विषयावर प्रभुत्व आहे. ते शाळेत रुजू होण्याअगोदर देऊळगाव राजा येथील दीनदयाळ विद्यालयात सहशिक्षक म्हणून सेवेत. होते.
या शाळेत त्यांनी इंग्रजी बरोबरच, हिंदी, भूगोल विषयांचे सुद्धा अध्यापन केलेले आहे. त्याच बरोबर कबड्डी चे उत्कृष्ट रेफ्री म्हणून सुद्धा ते तालुक्यात प्रसिद्ध आहे.


त्याच बरोबर व्यवसाय मार्गदर्शन चे विशेष मार्गदर्शक म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. ते विध्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून त्यांचा नाव लौकिक आहे. ते शुक्रवारी त्यांच्या 32वर्षाच्या प्रदीर्घ सेवेने निवृत्त होत आहे. त्यांच्या कार्याचा ठसा त्यांनी निर्माण केलेला आहे. त्या विषयाचा निकाल नेहमी चांगला आहे. या वर्षीचा 12वि चा &10विचा निकाल चांगला लागलेला आहे. मितभाषी, मिळून मिसळून वागण्याची कला, विध्यार्थास आपलंस करणे. हे गुण त्यांच्यात आहे. ते पंचक्रोशीत परिचित आहे. त्यांच्याकडून पुढील काळात असेच चांगले कार्य घडो, त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो.त्यांच्या सेवानिवृत्ती बद्दल अश्या शुभेच्या देण्यात आल्या.


याप्रसंगी झालेल्या छोटे खाणी कार्क्रमचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष शेख जमीर होते, प्रमुख पाहुणे म्हणून संचालक निकम , संचालक विष्णू सांगुळे, संचालक प्रा. दत्ता देशमुख, बूकंदाने, आढावे , चेके , शेवाळे , भुतेकर , समाधान कांबळे सर, विशाल भालेराव, तसेच शिक्षक, शिक्षतर कर्मचारी, यांनी शुभेच्छा दिल्या, संस्थेचे वतीने उपाध्यक्ष शेक , निकम , सांगुळे , दत्ता देशमुख, तर माजी उपसभापती दिनकर उखर्डे, समाधान कांबळे, शेवाळे, भुतेकर, सकुंडे यांनी सत्कार केला याप्रसंनगी ऐ.पी. जाधव, चेके सर, बूकंदाने , प्रा देशमुख, उपाध्यक्ष शेख याची मनोगते झाली, तसेच भालेराव यांचे भावुक भाषण झाले. व पुढील भविष्यासाठी हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक