Breaking News
भोकरदन तालुका

भोकरदनमधील सिल्लोड रोडवरील मिर्ची व्यापा-यांना इतर ठिकाणी हलविण्याची मागणी

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन नगरपरिषद च्या मुख्याधिकारी याना नूर सोशल ग्रूप च्या वतीने निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की भोकरदन शहरातील मिर्ची व्यापारी सिल्लोड रोड वर मिर्ची खरीदी करत असून तसेच सदर परिसर शहराच्या मध्ये भागी असून येथील दुकानदार,पायी चालणाऱ्या,दुचाकी स्वारांना व येथील रहिवासीयांच्या डोळ्यात मिरचीचे धूळ जात आहे त्यामुळे डोळ्याचे व फुफुसाचे मोठे आजार ही होवू शकते, तसेच येथील ये-जा करणाऱ्या लोकांना व परिसरातील दुकानदारांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे मिर्ची व्यापारी बिनकामी मिर्ची रोड वर फेकून देत असल्याने मिर्ची चा ठसका सपूर्ण परिसरात पसरत असल्याने येथून येजा करणाऱ्याना व येथील दुकानदाराना दुकानात बसने फार कठीण झाले आहे,तसेच मिर्ची व्यापारी तासंतास मिर्ची च्या भरलेल्या जड वाहने रोड वर उभे करून देत आहे ज्यामुळे या रोड वर ट्राफिक चा ही प्रशन निर्माण झाला आहे, तसेच सध्या कोरोना वायरस देशात व शहरात पसरत असून सिल्लोड रोड वर सोशल डिस्टन्स, चा ही फज्जा उडत आहे,व कोरोना पसरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे,तसेच सांबांधित व्यापाऱ्यां विरोधात कोरोना प्रतिबंध कायद्या चा खाली गुन्हा दाखल करावा,व तसेच येथील मिर्ची व्यापरियाना तात्काळ येथून हलविण्यात यावा व शहरातील नागरिकांना व वाहनधारकांना दुकानदारांना या त्रासापासून मुक्त करावे,अन्यथा नूर सोशल ग्रुप चा वतीने तिव्र आंदोलन छेडण्याच्या इशारा महेबूब भारती यांनी निवेदनात दिला आहे . यावेळी नूर ग्रूप चे अध्यक्ष महेबूब भारती,जाकेर खान,एम ए अजीज, समाधान तडेकर,शिव शिवराम शेवाडे,अनिल पाटील,पठाण सलमान खान,जलील शेख,सतीश सुरकडकर,रामदास देवराव रोडे,वसीम शेख,वाहन चालक,शेख मोहसीन,शेख अमीन इत्यादी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक