भोकरदन तालुका

फेरीवाल्यांना व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी खेळते भांडवल प्रदान करण्यात यावे

मधुकर सहाने : भोकरदन

भोकरदन शहरातील फेरिवाल्यासाठी विषेश सूक्ष्म-पतपुरवठा सुविधा योजनेची अंमलबजावणी कारण संदर्भात नगरपरिषदेचे स्वच्छता सभापती कदिर बापू यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांना निवेदन दिले की,
सध्या कोविड-19 (साथीचा रोग) मुळे मागिल चार-पाच महिन्यापासून भोकरदन शहारातील छोट्या-मोठ्या व्यापा-याचे दुकाने बंद असल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान झाले आहे.शहारातील फेरीवाले अनौपचारिक शहारातील अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे.नागरिकांना आर्थिक कुवतीप्रमाणे स्वत दरात वस्तु व सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात महत्वपूर्ण भुमिका बजावतात.त्याच्याव्दारे पुरविल्या जाणा-या वस्तूमध्ये भाज्या, फळे,तयार खाद्यपदार्थ,चहा,पाव,अंडी,कापड,चप्पल,कारागिराव्दारे उत्पादित वस्तू व सर्वामध्ये केशकर्तनालय,चर्मकार,पान टपरी धारक,कपडेधुलाई इत्यादीचा समावेश येतो.कोविड-19 सर्वत्र पसरलेला असल्यामुळे आणि परिणामी लॉगडाऊणमुळे त्यांच्या उपजिविकेवर विपरीत परिणाम झालेला आहे. आणि ते कमी भांडवलदार विक्री करतात आणि जे काही भांडवल त्याच्याकडे होते ते ही या लॉक डाऊन मध्ये शिल्लक राहिले नाही त्यामुळे फेरिवाल्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरु करण्यासाठी खेळते भांडवाचा पतपुरवठा तातडीने प्रदान करण्याची आवश्यकता आहे.शहारातील फेरिवाल्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा उभा करण्यासाठी वरिल योजना आपल्या शहरात लवकरात लवकर राबविण्यात यावे अशी मागणी अ.कदिर(बापू) यांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्ष यांच्या कडे केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक