Breaking News
भोकरदन तालुका

आश्वासनानंतर भोकरदन तालुक्यातील शेतकर्यांचे आंदोलन मागे

मधुकर सहाने : भोकरदन

शेतकऱ्यांची मका अनेक महिन्यापासून घरात पडून आहे तसेच मार्केटमध्ये मक्याने भरलेले शेकडो वाहने अडकून पडले आहे. तारीख वाढविण्यासाठी आज भोकरदन येथे शेतकऱ्यांच्या वतीने जालना रोडवर आंदोलन करण्यात आले.त्वरित राज्यसरकारने व केंद्र सरकारने याची दखल घेऊन राज्यभरातील शेतकऱ्यांना न्याय द्यावा या साठी सरकारकडे उपविभागिय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देऊन शासनाला मका खरेदी केंद्र लवकरात लवकर सुरु करावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने मागणी करण्यात आली.सोमवार पर्यंत सर्व मका खरेदी करू अश्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

मक्का खरेदीची तारीख वाढवुन मिळावी या मागणीसाठी शेतकर्यांनी तहसिल कार्यालयासमोर अशा प्रकारे आंदोलन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक