जालना जिल्हा

अंबड तालुक्यात 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

जिल्ह्यात एकूण 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह न्यूज जालना ब्युरो – जालना शहरासह आता कोरोना ग्रामीण भागात ही हळूहळू पाय पसरवत आहेत यातच शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास आलेल्या अहवालात एकूण 33 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. यात अंबड तालुक्यात महाकाला गावातील अकरा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहे यात काही महाकाळा कारखाना भागातील कर्मचारी याचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर यासह राहिलागड १,शाहगड २,जालना भाग्यनगर 3,उजेपुरी (ता बदनापूर)१,जमुना नगर १,नूतन वसाहत २,निरखेडा १,सोरती नगर १,मंठा चौफुली ४,सुखापुरी १,देऊळगावराजा १,पारशी गल्ली १,हनुमान नगर १,युसुफ कॉलनी १,लक्ष्मी नारायण पुरा १ असे एकूण ३३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले असल्याचे सरकारी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक