घनसावंगी तालुका

घनसावंगी तालुक्यात तांडा, वस्तीमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करून द्या….!


गोरसेनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना निवेदन सादर.
जांबसमर्थ/ कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार/
घनसावंगी तालुक्यात बंजारा समाजाचे एकुण ४४ तांडे,वस्ती असुन,भारत स्वातंत्र्य झाल्यापासून आजतागायत विविध तांड्यापर्यंत सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत.विविध तांड्यामध्ये वीज,पाणी,रस्ता, शैक्षणिक सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.या सह आरोग्याचे प्रश्न सतावत आहे.

शासनाकडून बंजारा समाजाकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या समस्यांशी सर्वसामान्य नागरीकांना हाल अपेष्टा सोसावे लागत आहे. प्रत्येक तांडामधील समस्यांची यादी निवेदनासोबत जोडली आहे.तहसीलदार नरेंद्र देशमुख यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी, कर्मचारी,बंद पडलेल्या खोल्या, पांदण रस्ते,मुख्य रस्ते, सार्वजनिक शौचालय,स्मशानभुमी,स्वच्छ पाणी पुरवठा, आरोग्य आदी जिवन आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,नसता तहशील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनावर गोरसेना तालुकाध्यक्ष रवींद्र राठोड, जिल्हा उपाध्यक्ष मुरलीधर राठोड, सचिव गणेश राठोड, एकनाथ पवार, अमोल राठोड,शंकर चव्हाण,बाळु राठोड यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक