Breaking News
जालना जिल्हा

जिल्ह्यातील 69 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह,जिल्ह्यची एकूण रुग्णसंख्या 2242

बबनराव वाघ/उपसंपादक

न्युज जालना : जालना जिल्ह्यातील 69 संशयीत रुग्णांचे अहवाल आज शुक्रवारी रात्री पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्यात जालना प्रयोग शाळेकडून 55 तर अँटीजण चाचणीद्वारे 14 संशयीत रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असल्याचे जिल्हा शल्यचिकीत्सकांनी सांगितले आहे.

जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या आता 2242 इतकी झाली असून त्यापैकी 1454 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. सर्वाधिक 11 रुग्ण हे अंबड तालुक्यातील महाकाळा येथील असून देऊळगाव राजा येथील 2 तसेच उज्जेनपुरी ता.बदनापूर, निरखेडा ता.जालना, सुखापुरी ता.अंबड, जामा मस्जिद शहागड,रांजनी ता.जालना, वाळकेश्वर शहागड,रोहिलागड,शहागड ,शनी मंदिर परतूर,येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश असून जालना शहरातील जमुनानगर 5,मंठा चौफुली 4,भाग्यनगर,सकलेचा नगर,वैभव कॉलनी,पॉवरलूम जुनी औद्योगिक वसाहत या भागातील प्रत्येकी 3, तसेच सोरटी नगर,पारशी गल्ली,हनुमान नगर, युसुफ कॉलनी, लक्ष्मीनारायनपुरा, सिव्हिल निवासस्थान,समर्थ बॅंकेजवळ,काद्राबाद,औद्योगिक वसाहत जालना आणि समर्थनगर येथील प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक