घनसावंगी तालुका

दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किसान सभेचे घनसावंगी तालुक्यात निदर्शने

घनसावंगी / नितीन तौर

घनसावंगी तालुक्यातील

कुंभार पिंपळगाव, राजूरकर कोठा ,राजा टाकळी, मुद्रेगाव,उक्कडगाव येथे कॉम्रेड गोविंद आर्द्ड यांच्या नेतृत्वाखाली दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी किसान सभेचे घनसावंगी तालुक्यात निदर्शने करण्यात आली यावेळी गोविंद आर्दड ,नामदेव तौर,जालिंदर बहिर,बालासाहेब राऊत,बाळू आर्दड,जनार्धन भोरे,बजरंग तौर,गणेश पवार,राजेभाऊ बहिर, अशोक बहिर,पंडित पवार,नारायण बहिर आदी उपस्थित होते

यामध्ये दुधाला दूध डेअरीवर 30 रु प्रति लिटर भाव द्या,दूध पावडर आयात धोरण मागे घ्या,दूध पावडर निर्यातीसाठी प्रतिकिलो 50 रु अनुदान द्या, लोकडाऊन काळात शेतकऱ्यांना प्रति लिटर दुधासाठी 10 रु अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत याबाबत राज्यभर आंदोलन करण्यात आले असल्याचेही आर्द्रड यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक