जाफराबाद तालुका

दुध दर व अनुदान वाढीसाठी भाजपाच्या वतीने जाफराबादेत आंदोलन

कुंभारझरी/ज्ञानेश चव्हाण

जाफ्राबाद येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने गायीच्या दुधाला सरसकट १० रु.प्रती लिटर अनुदान व दुध पावडरला प्रती किलो ५० रु.अनुदानाच्या मागणीसाठी तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी व आर्थिक अडचणी लक्षात घेता तहसील कार्यालय जाफ्राबाद येथे भाजप च्या वतीने आंदोलन करण्यात आले.

कोरोना मुळे सतत वाढणारा लॉकडाऊन व संचार बंदी मुळे बाजारामध्ये दुध विकता येत नसल्यामुळे व चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करत आहे.या संकटाच्या काळा मध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे. महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते.त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते.

मंत्र्यांचे लागेबांधे असलेल्या दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे.इतर शेतकऱ्यांना व दुध उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर सोडले आहे त्यामुळे तालुक्यातील दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. राज्य सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी दुध उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणखी आक्रमक होईल असा इशाराही यावेळी देण्यात आला.

यावेळी भाजपा तालुखा अध्यक्ष सुरेश दिवटे ,संतोष.लोखंडे,भाऊसाहेब ,जाधव,दगडूबा गोरे,गोविंदराव पंडीत,दिपक वाकडे,जगन पंडीत,साहेबराव कानडजे, उद्धव दुनगहू निवृत्ती दिवटे,शे.कौसर,विजय सोनवणे,साहेबराव दळवी,अशोक कणखर,गजानन लहाने,रमेश गाढे,समाधान चव्हाण,संदीप वाकडे,अमोल पडघन,सचिन जैस्वाल,नाना चव्हाण,नाना पंडीत सर,अनंता सोळुंके,राजेंद्र खरात इत्यादीसह दुध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक