Breaking News
बदनापूर तालुका

भाजपच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बदनापूर तहसील कार्यालवर ठिय्या आंदोलन

बदनापूर प्रतिनिधी/ किशोर सिरसाठ ता (01) :  भाजपाच्या वतीने ता.01 रोजी बदनापूर तहसीलदार कार्यालय येथे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न प्रलंबित असल्याने नारायण कुचे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. आज महा विकास आघाडी सरकारच्या काळात शेतकऱ्यांचे शेतीपूरक व्यवसाय असणारा दूध व्यवसाय आज डबघाईला आला असून गायीच्या दूधाला सरसकट प्रती लीटर १० रू अनूदान द्या, दूध भूकटी निर्यातीला प्रती किलो ५० रू अनूदान द्या, दूध खरेदीचा दर प्रती ‍लिटर ३० रू करा, सद्या शेतकऱ्यानां आतिउष्टी मुळे भयभीत झालेल्या बळीराजाला युरिया मिळत नाही म्हणून शासनाने २६६ रू प्रती बॅग दराने मूबलक प्रमाणात यूरीया उपलब्ध करून द्यावा, तसेच बदनापूर तालूक्यात ओला दूष्काळ जाहिर करून अतिवृष्टीने झालेल्या नूकसानीचे सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यानां प्रति हेक्टर ५० हजार रूपये तातडीने मदत देण्यात यावी.
तहसिल कार्यालय बदनापूर यांच्या प्रागणात ठिय्या आंदोलन करण्यात आले. (छायाचित्रे किशोर शिरसाठ)
कोरोना संकटाच्या काळात ग्राहकांना आलेले वाढीव विज बिल माफ करण्यात यावे. शासकिय मका खरेदी केंद्र सूरू करूण मुदत वाढ देण्यात यावी. निराधारांचे थकित अनूदान तात्काळ देण्यात यावे. अशा अनेक मागण्या भाजपा महायूतीच्या वतीने बदनापूर तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन व निर्देशने करून या आघाडी सरकारचा जाहिर निषेध करत माघण्याचे निवेदन तहसीलदार छाया पवार यांना देण्यात आले, कोरोना परिस्थितीत बळीराजा हवालदिल झाला असून आर्थिक संकटात सापडला आणि त्यात आतिउष्टीने पिके नष्ट झाल्याने आता दोहेरी संकट उभा ठाकल्याने चिंतेत भर पडली शेतकऱ्यांचे शेतीपूरक व्यवसाय असणारा दूध व्यवसाय आज डबघाइच्या खाइत बुडाला असून त्या दुधाला 10 अनुदान तत्काळ द्यावा,
आज रोजी शेतकऱ्यांवर असंख्य संकट असताना पिकांसाठी युरिया शेतकऱ्यांना आज रोजी मिळत नाही हे दुर्दैवी म्हणाव लागेल म्हणूच युरिया 266 रु दराने शासनाने शेतकऱ्यांना उपलब्ध करावा तसेच बदनापूर तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने सर्व पिके अति पाण्याने करपून गेले आहे म्हणून ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांच्या सरसकट पंचनामे करावे आणि हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी, कोरोना काळात वाढीव वीज बिल कपात करावा, निर्धाराने थकित अनुदान तात्काळ मिळावे हे ज्वलंत प्रश्न तत्काळ महाविकास आघाडी शासनाने सोडावे अन्यथा भाजप महायुतीच्या वतीने जन आंदोलन छेडण्यात येईल..नारायण कुचे (आमदार)
यावेळी आमदार नारायण कूचे , भीमराव भूजंग ता.अध्यक्ष भाजपा, बद्रीनाथ पठाडे , वंसतराव जगताप, सत्यानाराणय गिल्डा, भगवान मात्रे , पदमाकर जऱ्हाड, गणेश कोल्हे भाजपा यूवा मोर्चा ता.अध्यक्ष , विलास जऱ्हाड शहराध्यक्ष भाजपा, दत्ता पा नागवे, एकनाथ मोरे,भास्कर घनघाव , भगवान कदम, नंदकिशोर शेळके, नामदेव तिडके, नामदेव गिते, संदिप पवार , दिपक मुडलींक , बाबासाहेब कऱ्हाळे, सतीश साबळे, विजय रगडे, रवी जाधव, शिवाजी कदम , उमाजी चव्हाण , गणेश बावणे, रावसाहेब कोल्हे, संतोष वरकड , तूकाराम चव्हाण , गोरखनाथ खैरे, कैलास दूधानी , गजानन काटकर, रघूनाथ होळकर , भगवान बारगाजे , बाजीराव मूळक , बाळू मूळक , राम पाटील , भीमराव जावळे, ‍ अजीतसिंग खोकड, विशाल जारवाल आदी उपस्थीत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक