Breaking News
भोकरदन तालुका

पिंपळगाव रेणुकाई परिसरात परिसरात विजेचा लपंडाव वाढला; नागरिक त्रस्त

पिंपळगाव रेणुकाई /गणेश खिस्ते येथील वीज केंद्रातुन गेल्या काही महिन्यांपासून पिंपळगाव रेणुकाई परिसरात वीज पुरवठा सातत्याने खंडीत होत आहे . विजेचा लपंडाव वाढल्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत . पिंपळगाव येथील वीज पुरवठा दररोज खंडीत होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे . रात्रीच्या सुमारास अनेकदा वीज पुरवठ्याचा लपंडाव सुरू असतो . थोडेसे वादळ आणि हलक्यास्या पावसाच्या सरी आल्या तरी तितक्याने सुद्धा येथील वीजबत्ती नेहमी गुल होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत . येथील33 केव्ही वीज वितरण कंपनीच्या केंद्रावरून पिंपळगाव रेणुकाई सह काही गावांना वीज पुरवठा होतो .परंतु तांत्रिक बिघाडामुळे परिसरातील अनेक गावाचा बीज पुरवठा खंडीत होत आहे. सध्या पावसाळा सुरु असून हलक्याशा वादळाने सुध्दा या भागातील वीज पुरवठा खंडीत होण्याचा प्रकार घडत आहे . रात्री बिघाड निर्माण झाल्यास दुरुस्ती होत नाही . परिणामी संपूर्ण रात्र नागरिकांना अंधारातच काढावी लागते . महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावावी , अशी मागणी नागरिकांनी केली आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक