Breaking News
परतूर तालुका

रक्तदान शिबीर घेऊन अण्णाभाऊ साठे यांची 100 जयंती साजरी


दिपक हिवाळे /परतूर न्यूज नेटवर्क
शहरातील साठेनगर मध्ये दिनांक 01/08 2020 रोजी अण्णाभाऊ साठे नगर मध्ये डॉ अण्णाभाऊ साठे यांची 100 वी जयंती साजरी करण्यात आली. ध्वजा रोहन व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. झरेकर होते तर प्रमुख पाहुणे सहायक पोलीस उप निरीक्षक डी आर. हिवाळे जालना (से. नि ), राष्ट्रवादी काँग्रेसचे ता. अध्यक्ष रमेश सोळंके, वैजनाथ बागल,नगर सेवक राजू भुजबळ, बाबुराव हिवाळे, नानाभाऊ कासारे, हे होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद्र पानवाले यांनी केले तर आभार दिपक हिवाळे यांनी मानले.

जयंती निमित्य रक्तदान शिबीर लोकमान्य रक्त पेढी औरंगाबाद यांच्या माध्यमातून समाज मंदिर येथे 33 रक्त दात्यांनी रक्तदान केले. शेवटी नितीन जेथलिया यांच्या हस्ते 10 व 12 वी पास झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया कॉपी करू नका. मुख्य संपादक